महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक समाधान

इयत्ता आठवी – मराठी

पाठ १३ : संतवाणी


(अ) शब्दार्थ :

  • आजि – आज
  • देखिलें – पाहिले
  • अवघा – संपूर्ण
  • शीण – थकवा
  • निरसणे – दूर होणे, नाहीसा होणे

भावार्थ :

संत सेना महाराज संतांच्या भेटीमुळे झालेल्या आनंदाचे वर्णन करताना म्हणतात,
“संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोन्यासारखा मोलाचा झाला आहे. जसे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आल्यावर आनंद होतो, तसा आनंद मला झाला आहे.”

पुढे ते म्हणतात की, संतचरणांचे दर्शन झाल्यामुळे माझा सगळा शीण नाहीसा झाला आहे. माझ्या घरी जणू दिवाळी किंवा दसरा सण आल्यासारखा उत्साह ओसंडून वाहत आहे.


(आ) शब्दार्थ :

  • संगे – सोबत
  • दर्शनें – दर्शनाने
  • हेकळी – वाकडी
  • टाकळी – लहान झुडूप
  • अभाविक – भाविक नसलेले
  • खर – गाढव

भावार्थ :

संत चोखामेळा म्हणतात,
“जसे चंदनाच्या सहवासात बोरी, बाभळी आणि इतर झाडे-झुडपे आली तर तीही चंदनाप्रमाणे सुगंधी होतात, तसेच संतांच्या सहवासात आलेले सर्वजण भाविक बनतात.”

ते पुढे सांगतात की, मनुष्याने जन्म घेतला आहे तर त्याने परमार्थ साधावा. अन्यथा त्याचे जीवन भूमीवर भार ठरेल.

Scroll to Top